esakal | शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची भरती; पुणे विद्यापीठ आणि जेएनयूतील 'इतके' प्राध्यापक इच्छुक!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivaji_University

राज्यपाल कार्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी उच्चस्तरीय संशोधन समिती नेमली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत गुरूवारी संपली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची भरती; पुणे विद्यापीठ आणि जेएनयूतील 'इतके' प्राध्यापक इच्छुक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विराजमान होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे अर्धा डझन प्राध्यापक इच्छुक आहेत. कुलगुरूपदासाठी पुण्यातून सहा जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद शिंदे हे जून महिन्यात सेवानिवृत्त झाले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, कुलगुरू पदासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारी (ता. 2) शेवटची तारीख होती. यासाठी सुमारे 50 अर्ज दाखल झाले आहेत.

- अभ्यास केलाय पण लक्षात राहत नाही? त्यासाठी 'ही' सोपी तंत्रे नक्की वाचा!

पुणे विद्यापीठातून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य संजय चाकणे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे, यासह रसायनशास्त्र विभागातील अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी यांनी अर्ज केले आहेत.

- 'सरकार, शाळांच्या फी वाढीबाबत काहीतरी करा'; खासगी शाळांकडून पालकांची पिळवणूक

राज्यपाल कार्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी उच्चस्तरीय संशोधन समिती नेमली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत गुरूवारी संपली. या पदासाठी महाराष्ट्रातून सुमारे 50 अर्ज आले आहेत. यामध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) दोन प्राध्यापकांनीही अर्ज केला आहे.

- पुणे : कोरोनामुळे मोटार खरेदी होती थंड; पण आता...

डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. नवे कुलगुरू नियुक्त करण्यासाठी शासनाला शोध मोहिम सुरू करावी लागणार आहे. तो पर्यंत डॉ. नितीन करमळकर यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहण्याचे आदेश १५ जून रोजी शासनाने काढले होते. 

दरम्यान, २०१७ मध्ये पुणे विद्यापीठाच्या रिक्त झालेल्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू असताना तेव्हा देवानंद शिंदे यांच्याकडेच येथील अतिरिक्त कार्यभार होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top