

The initiative aims to connect NCC-trained youth with corporate careers by recognising their leadership, discipline and communication skills.
ESakal
प्रज्वल रामटेके
पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील तरुणांसाठी उद्योग क्षेत्राची दारे खुली झाली आहेत. केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’अंतर्गत (पीएमआयएस) महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने राबविलेल्या ‘कॅडेट टू करिअर’ उपक्रमातून ६४ जणांची पंचतारांकित हॉटेल समूहात विविध विभागांत इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आली आहे.