

Sakal
बारामती : जगप्रसिध्द फुटबालपटू मेसी याच्या भारत दौ-याच्या पहिल्याच दिवशी कोलकता येथे अर्जेटींनातील प्रसिध्द टँगो नृत्य सादरीकरणाचा मान बारामतीकर अजिंक्य अशोक देशपांडे यांना मिळाला. मूळचे बारामतीकर असलेले अजिंक्य अशोक देशपांडे हे मुंबईत वास्तव्यास असून गेली अनेक वर्ष ते नृत्य प्रशिक्षण व सादरीकरण करतात.