

Protest Outside Ajit Pawar’s Residence in Baramati
Sakal
बारामती : महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) अंतर्गत विद्यार्थ्यांना देय असलेली १२६ कोटी रुपयांची थकीत अधिछात्रवृत्ती व विद्या वेतन तात्काळ अदा करण्यात यावी, या मागणीसाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषात कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते.