PG Medical Seats: वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये वाढ; राज्यात एक हजार ६६ जागांची भर; महाराष्ट्र देशात दुसऱ्यास्थानी

Maharashtra PG Medical Seats : महाराष्ट्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एमडी आणि एमएसच्या जागांमध्ये १,०६६ ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण जागा ६,५४९ वरून ७,६१५ झाल्या असून, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागांची भर पडली आहे.
Maharashtra increases MD and MS postgraduate medical seats by 1,066 across government and private colleges.

Maharashtra increases MD and MS postgraduate medical seats by 1,066 across government and private colleges.

esakal

Updated on: 

पुणे, : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांत पुढील वर्षासाठी पदव्युत्तर पदवीच्या (पीजी : एमडी, एमएस) जागा एक हजार ६६ ने वाढल्‍या आहेत. एकूण ३५ पैकी २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्‍ये ३४६ जागा वाढल्‍या आहेत. आगामी शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील एकूण पदव्युत्तर पदवीच्‍या जागांची प्रवेश क्षमता सहा हजार ५४९ वरून सात हजार ६१५ वर पोहोचली आहे. पुण्‍याच्‍या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील १७ जागांचा त्‍यामध्‍ये समावेश आहे

Loading content, please wait...