
रखडलेली पोलीस भरती लवकरच सुरू होणार
बारामती : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पोलिस भरती (police recruitment ) लवकरच होणार आहे. सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. आजवरच्या पोलिस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी (Ground test) होत असे, आता मात्र नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. लेखी परिक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या बाबत सह्याद्री करिअर अँकेडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी या बाबत माहिती दिली.
नोव्हेंबर 2019 मध्ये पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस दल (SRPF) व पोलिस वाहन चालक अशा 5200 पदांसाठी अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्या नंतर महापोर्टल रद्द होणे, सरकार बदलले, कोरोना, आरक्षण या कारणांमुळे ही भरती प्रक्रीया रखडली होती. (police recruitment will start soon)
हेही वाचा: शहराच्या वेगवेगळ्या भागात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना
आता पोलिस भरती लेखी परिक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलिस खात्याकडून प्रसिध्द करण्यात आल्याने राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत. पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एस.ई.बी.सी. (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता. त्या उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा ई. डब्ल्यु. एस. (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.
हा विकल्प निवडण्याचा कालावधी 5 ते 15 ऑगस्ट असा 11 दिवसांचा असेल. ई. डब्ल्यु. एस. चे प्रमाणपत्र ही 2018-19 व 2019-20 या परीक्षांसाठी मार्च 2020 पर्यंतचे असणे आवश्यक केले आहे. त्या दृष्टीने उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जावे. उमेश रूपनवर म्हणाले , महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आयुक्तालये, ग्रामीण परीक्षेत्रे, एस.आर. पी. चे ग्रुप व रेल्वे विभाग या सर्व युनिटमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या.
Web Title: Maharashtra Police Recruitment Will Start
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..