हे श्री राम ! पक्षप्रमुख उद्धव साहेबांना बळ दे बंडखोरांना सुबुद्धी दे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics cheat shiv sena party  sharad pawar support cm uddhav thackeray pune

हे श्री राम ! पक्षप्रमुख उद्धव साहेबांना बळ दे बंडखोरांना सुबुद्धी दे...!

विश्रांतवाडी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळो आणि बंडखोरांना सुबुद्धी प्राप्त होवो यासाठी येरवडा येथे प्रभु श्रीरामांची महाआरती करण्यात आली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद व शिकवणीचे आम्ही सर्व शिवसैनिक, दैवत मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत काल, आज आणि उद्या ठामपणे आहोत. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला समर्पित आहे. उद्धव साहेब आम्हा शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील नेते आहेत. अशा भावना पुणे शिवसेना उपशहर प्रमुख आंनद गोयल यांनी व्यक्त केल्या.

चिमा गार्डनजवळील

राम मंदिर येथे शिवसैनिकांनी वतीने महाआरती व होम हवन केले. यावेळी उपशहरप्रमुख आनंद गोयल, शहर समन्वयक सुनील जाधव, उपशहर संघटक सागर माळकर, विधानसभा उपप्रमुख सचिन भगत, विभाग समन्वयक पाला मोरे, विधानसभा समन्वयक सचिन खांदवे, विभाग समन्वयक सतिश मुळीक, विभाग संघटक शंकर संगम, विभाग प्रमुख किशोर पाटील,विभाग प्रमुख शांताराम खलसे, विभाग प्रमुख शिवाजी वडगुले, विभागप्रमुख सोमनाथ खांदवे, संजय मोझे, उपविभाग प्रमुख संतोष गोविंद भोसले प्रभाग प्रमुख राजेश एरंडे, शशी देवकर, शाखाप्रमुख आदिल शेख युवासेना मा.विभाग आधिकारी प्रशांत मोरे,अथय वाल्हेकर, उमेश मोरे,बंटी दोरे, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका कविता आंब्रे, स्मिता चव्हाण, सुस्मिता जाधव, यशवंत मोरे,प्रमोद मोरे, आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Politics Cheat Shiv Sena Party Sharad Pawar Support Cm Uddhav Thackeray Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top