
Sangram Thopte: भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजप वाटेवर आहेत, याची चर्चा तर सुरुच आहे. पण आता त्यांचा हा भाजप प्रवेश किधी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यासंदर्भात आता ते भोर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधत आहेत. आज मुळशी तालुक्यातील काही गावात बैठका घेणार तर उद्या भोर तालुक्यात मेळावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.