
खडकवासला : ‘‘पक्षाच्या कठीण काळात ज्यांनी निष्ठा टिकवून साथ दिली, त्यांच्यासाठी काँग्रेस नेहमी खंबीर आधारस्तंभ ठरेल. त्यांच्या संघर्षाला संघटनेचे सर्वतोपरी बळ मिळेल. मात्र पक्ष सोडून गेलेल्यांसाठी दारे कायमची बंद झाली असून, त्यांना पुन्हा प्रवेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिला.