
इंदापूर : ‘‘जो माणूस मंत्रालयात मोबाइलवर गेम खेळत होता, तो पकडला गेला. त्याला आम्ही जबाबदार नाही. पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला. याचा अर्थ तो तुमच्याच विचाराच्या माणसाने काढला आहे. पण बिचाऱ्या रोहितला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली. अहो, आम्ही फक्त तो समाजमाध्यमांवर टाकला. मात्र या प्रकरणात सरकारने हद्दच केली आहे,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.