
Pune Elections
Sakal
पुणे : ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे. गामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच येणार आहे. पुणे महापालिकेवर भगवा फडकावयाचा आहे. किती जागा लढवायच्या हे मात्र ते गुलदस्त्यात ठेवले आहे. आताच त्याबाबत बोलणे योग्य नाही. स्वतंत्र लढायचे की युती करून हे आम्ही एकत्र बसल्यावर ठरेल, युती जर झाली तर झाल्यावर आम्ही ती संख्या जाहीर करू.’’ असा खुलासा राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केला.