

Private School Admission SOP Maharashtra Education Directorate Sets New Rules for Admissions Fees and Transparency in Schools
sakal
पुणे: राज्यातील विनाअनुदानित (खासगी) पूर्व प्राथमिक शाळांमधील मनमानी प्रवेश प्रक्रिया, देणगी आणि अतिरिक्त शुल्काची वसुली रोखण्यासाठी शिक्षण संचालनालयाने कठोर प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. या निर्णयामुळे विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदी करण्याच्या सक्तीला आळा बसणार असून, आर्थिक लुटीला चाप बसून पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.