

Pune
esakal
पुणे: सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आल्यास अथवा अन्य काही तांत्रिक कारणांमुळे दस्तनोंदणी करताना अडचणी येऊ नयेत, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधकांना ‘स्किप’ हा पर्याय वापरण्याचे अधिकार दिले होते. मात्र मुंढवा आणि ताथवडे येथील जमीन व्यवहार गैरप्रकारांनंतर हा अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय आता या पर्यायाचा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.