

Jejuri gad incident
esakal
Priest Assaulted After Dispute Over Temple Rules : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ जेजुरी गडावर रविवारी दुपारी एक संतापजनक घटना घडली. काही भाविकांनी पुजाऱ्याला मारहाण केली यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांच्या समूहाने संबंधित पुजाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.