

Weather Update
sakal
पुणे : कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. उद्या (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे.