

Pune Rain Break: Monsoon Pauses After One Day, IMD Issues Yellow Alert Across Maharashtra
esakal
मॉन्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात जोरदार हजेरी लावून पावसाने सध्या ब्रेक घेतला आहे. पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत गेल्या चार दिवसांपासून पावसाची दडी कायम असल्याने हवामानातील बदल नागरिकांना जाणवत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पुन्हा दमदार पावसाची अपेक्षा लागली आहे.