esakal | "संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक
sakal

बोलून बातमी शोधा

"संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

"संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

sakal_logo
By
अश्विनी जाधव-केदारी

पुणे : ''खासदार संजय राऊत अनेक लोकांच्या टीका सहन करून चोरावर मोर होण्यात सक्षम आहेत, त्यामध्ये मी काय बोलू. "ही इज रॉकस्टार" अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कौतूक केले. पुण्यामध्ये आज उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विविध महिलांना सदस्य नोंदणीपत्रक देण्यात आले.

हेही वाचा: 'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान

''शिवसेना तळागाळापर्यंत पोहचावी , तसेच या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी आता वेग येणार आहे. जिथे जिथे महिलांवर अत्याचार होतात तिथे आवाज उठवण्यासाठी शिवसेना तत्पर असते. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. या काळात त्यांच्याशिवाय चांगला माणूस दुसरा कोणी मिळाला नसता." अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्याच्या कामाचे कौतुक केले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,''महिलांना प्रतिनिधित्व देण्यात शिवसेना आघाडीवर असते. हे फक्त निवडणुकीपुरते नाही, तर महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महिला आघाडी काम करणार आहे''असेही त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा: 'पटोलेंनी माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी, मग बोलावे'

पुण्यात एका आंतरधर्मीय लग्नाची चर्चा सुरू असून लग्न करु इच्छिणाऱ्या मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणीला धमक्या येऊ लागलेल्या आहेत. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'च्या चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत बोलताना उर्मिला मारतोंडकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र धर्म हा महत्वाचा आहे. आजतागायत आपण 'लव्ह जिहाद'ला थारा दिलेला नाही. कुठल्याही प्रकारची बळजबरी चुकीची आहे. एकांगी दृष्टीने बघून काही लोक राजकीय किंवा सामाजिक स्वार्थ जपण्यासाठी करत असतील तर चुकीचे आहे. वस्तुस्थिती काय आहे ते समजून अन्यायाला वाचा फोडायला हवी.''

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करून 7 महिने उलटले, तरीही अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण सुरु आहे. दरम्यान याबाबत बोलताना, मारतोंडकर म्हणाल्या'' राज्यपाल कोश्यारी जेव्हा यादी करतील तेव्हा करतील त्यामुळे काही काम थांबत नाही. नेतेमंडळी एक फळ देतात चार फोटो काढतात, ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. काही नेते गदारोळ करतात, त्यांना करू द्याव्यात. नेतेमंडळी मूळमुद्दे सोडून दिवसभर कॅमेरा समोर येत असतात.''

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ अन् राडा झाला या प्रकाराबाबत बोलताना मारतोंडकर म्हणाल्या की, जे घडलं ते चुकीचं घडलं. केंद्रांत वेगळे आणि राज्यात वेगळे असे नियम आहे का हे स्पष्ट करावे?''

loading image