

Maharashtra Faces Water Stress Ahead of Monsoon; Dam Storage Down by 32.45 TMC
sakal
पुणे: राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण सुमारे ३०२८ धरणांमध्ये सध्या ४००.८३ टीएमसी म्हणजेच २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ४३३.२९ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा सुमारे ३२.४५ टीएमसी म्हणजेच तीन टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे.