
पुणे : राज्यात या वर्षी चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या राज्यात जलसाठा ५९.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा अवघा २८.२८ टक्के होता. विशेषतः विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा वाढला असून, काही धरणांतून विसर्गही सुरू आहे, तर पुणे विभागातील धरणसाठा हा सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.