IMD predicts retreating monsoon in Maharashtra
esakal
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी लवकरच पावसाची (Maharashtra Monsoon Forecast) रिपरिप पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडतील. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.