

Maharashtra Land Tenancy Rules Under Scrutiny Revenue Department to Review All Approved Tenancy Cases Across the State
sakal
पुणे : नियमांचे पालन न करता काही शेतजमिनींवर परस्पर कुळ लावण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची गंभीर दखल महसूलमंत्र्यांनी घेतली असून, आतापर्यंत कुळकायद्याखाली मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कलम १५५ अधिकाराच्या गैरवापरानंतर आता कुळकायद्याचा गैरवापर झाला असल्याचे यावरून बोलले जात आहे.