

Maharashtra road accident statistics 2024
Sakal
पुणे : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात एकूण ३६ हजार ८४ रस्ते अपघाताची नोंद झाली असून, त्यापैकी १५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुले आणि किशोरवयीन मुलांचे प्रमाण (० ते १८ वयोगट) हे १ हजार १३५ म्हणजे ११ टक्के आहे; तर रस्ते अपघातात पुणे, मुंबई आणि नागपूर येथे मुलांचे जखमी होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे संयुक्त राष्ट्र बाल निधीने (युनिसेफ) तयार केलेल्या विश्लेषण अहवालातून समोर आले आहे.