

Maharashtra Sahitya Parishad transparent governance initiative
sakal
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याचे आश्वासन देणारा जाहीरनामा ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने मंगळवारी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. वाचनसंस्कृती बळकट करणे आणि नव्या पिढीला मराठी भाषेशी जोडण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन यात देण्यात आले आहे.