हिंदी सक्तीला ब्रेक! महाराष्ट्राच्या नव्या अभ्यासक्रमात मोठे बदल, तिसरी भाषा रद्द करण्याचा निर्णय; कोणत्या भाषांचा असणार समावेश?
Maharashtra School Curriculum Changes, Hindi Removal From Syllabus : याआधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नव्या मसुद्यातून हिंदी वगळण्यात आली आहे.
पुणे : हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात (School Curriculum) मोठा बदल केला आहे. तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा अनिवार्य ठेवण्याचे (Hindi language Policy) धोरण नवीन अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आले आहे.