
Maharashtra Schools
Sakal
पुणे : राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयानंतर आता शालेय शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांमधील समित्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील समित्याही पाच समित्यांमध्ये एकत्रित केल्या आहेत.