

पिंपरी, ता. २ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची लोकप्रिय ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेचा पास आता ऑनलाइनदेखील मिळणार आहे. चार आणि सात दिवसांचे हे पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.
नागरिकांना कमी खर्चात पर्यटन व धार्मिक स्थळांना जाता यावे, यासाठी १९८८ पासून ही योजना राबविली जाते. साधी बस, शिवशाही आणि ई-बस अशा तीन वर्गांसाठी हे पास उपलब्ध आहेत. याची वैधता पहिल्या दिवशी रात्री बारापासून ते शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असते. पूर्वी हे पास काढण्यासाठी आगारात किंवा बसस्थानकावर जावे लागत असे.
पास कसा आणि कोठे काढायचा?
- प्रवाशांना हे पास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (msrtc.maharashtra.gov.in) काढता येणार
- संकेतस्थळावर ऑनलाइन पास वितरणाची स्वतंत्र कार्यप्रणाली (पोर्टल) उपलब्ध
- तिथे प्रवासी आपली माहिती भरून, आवश्यक तो कालावधी (४ किंवा ७ दिवस) निवडून आणि ऑनलाइन पेमेंट करून पास त्वरित मिळणार
---------
काय आहेत या पासचे फायदे?
- अमर्याद प्रवास : या पासच्या कालावधीत प्रवासी महाराष्ट्रात एसटीच्या कोणत्याही (नियोजित नियमांनुसार लागू असलेल्या) गाड्यांमधून कितीही वेळा आणि कुठेही प्रवास करू शकतात.
- नियोजन करणे सोपे : पर्यटनासाठी किंवा सलग सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे नियोजन करणाऱ्या कुटुंबियांसाठी आणि प्रवाशांसाठी ४ व ७ दिवसांचे हे पास अत्यंत किफायतशीर ठरतात.
तिकीट दर किती?
बसचा प्रकार - चार दिवस - सात दिवस
प्रौढ - मुले - प्रौढ - मुले
१. साधी, जलद, रात्रसेवा, आंतरराज्य शहरी व मिडीबस - १,८१४ - ९१० - ३,१७१ - १,५८८
२. शिवशाही (आसनी) आंतराज्यासह - २,५३३ - १,२६९ - ४,४२९ - २,२१७
३. ई-बस (ई-शिवाई) - २,८६१ - १,४३३ - ५,००३ - २,५०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.