maharashtra State Cooperative Bank annual meeting
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत सलग अकराव्या वर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. राज्य बॅंकेला गतवर्षी ६१५ कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला होता, तर यावर्षी बॅंकेला ६५१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.
तसेच, देशातील राज्य आणि जिल्हा बँकांमध्ये प्रथमच सुरू केलेल्या ‘यूपीआय अॅक्वायरर’ आणि ‘अर्ली वॉर्निंग सिग्नल सिस्टम’चे उद्घाटन बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते करण्यात आले.