राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटींचे कर्ज

राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटींचे कर्ज
Published on

मुंबई, ता. १२ : केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील वैधानिक संस्था राष्ट्रीय सहकारी विकास मंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज एनसीडीसीकडून मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. या वित्तीय सहाय्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण होण्यास तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होणार आहे. मंजूर कर्जाची परतफेड पाच वर्षांत दहा सहामाही हप्त्यांमध्ये करण्याची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com