Pune Theatre : राज्य नाट्य स्पर्धेला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; पाच हजार तिकिटांची विक्री; अंतिम फेरी पुण्यात घेण्याची मागणी!

State Theatre Competition : पुण्यात ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; पाच हजार तिकिटांची विक्री झाली आहे. रसिक आणि कलाकारांच्या मागणीवर अंतिम फेरी पुण्यात घेण्याची शक्यता.
Audience Overwhelms 64th Maharashtra State Theatre Competition at Pune

Audience Overwhelms 64th Maharashtra State Theatre Competition at Pune

Sakal

Updated on

पुणे : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला पुण्यात रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. स्पर्धेच्या तब्बल पाच हजार तिकिटांची विक्री झाली असून दररोज नाट्यगृह ‘हाऊसफुल्ल’ होताना दिसत आहे. हा प्रतिसाद पाहता स्पर्धेची अंतिम फेरीही पुण्यात घेण्याची मागणी कलाकार आणि रसिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धा अतिशय उत्साहात आणि प्रेक्षकांच्या ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादात पार पडते आहे. मधल्या काही काळात निर्माण झालेले राज्य नाट्य स्पर्धा आणि रिकामे नाट्यगृह, हे समीकरण मोडून काढत रसिकांना स्पर्धेकडे खेचून घेण्यात पुणे केंद्रावरील संयोजन चमू यशस्वी ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com