विद्यार्थी संघटनेने राज्यपालांकडे मागितली अपॉइंटमेंट; 'या' विषयावर करणार चर्चा!

Bhagat_Singh_Koshyari
Bhagat_Singh_Koshyari
Updated on

पुणे : लाॅकडाऊन काळात कधी सत्ताधारी तर कधी विरोधक यांच्या राजभवनावर फेऱ्या वाढल्याने हा विषय चांगलाच चर्चीला जात आहे. यावरुन राजकीय नेते ट्रोलही होत आहे. आता मात्र महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासू) या विद्यार्थी संघटनेने राज्यात परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्तिथीवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वेळ मागितली आहे.

महाराष्ट्रात विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरीने गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सुमारे ९ लाख विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

मात्र, भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतला हे योग्य आहे, पण शैक्षणिक आरोग्याचे काय करणार?, या विद्यार्थ्यांवर कोरोना बॅचचा शिक्का मारला जाईल अशी भूमिका घेत यास विरोध केला. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन या निर्णयावर स्थगिती आणण्यासाठी मागणी केली. 

राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्याचा दाखला देत परीक्षा रद्द करता येणार नाहीत अशी भूमिका घेतली, त्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले. त्यानंतर पुन्हा परीक्षेवरून गोंधळ निर्माण झाला असून, विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. चार दिवस होऊन गेले तरी अद्याप राज्य सरकारला याबाबत तोडगा काढता आलेला नाही. 

परीक्षा होणार की नाही याचा निकाल लागत नसल्याने विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना योग्य सूचना, मार्गदर्शनही मिळत नाही. अशा स्थितीत राजकारण न करता परीक्षा रद्दचा निर्णय कायम ठेवणे गरजेचे आहे. 

या पार्श्वभूमीवर'मासू'चे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले, "आमची भूमिका अराजकीय असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत. अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून जो गोंधळ सुरू आहे, त्यावरून विद्यार्थांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे हा गोंधळ संपावावा आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com