विनापगार काम करणाऱ्या शिक्षकांना आमदारांनी केले आवाहन; काय ते वाचा सविस्तर!

Tearchers_School
Tearchers_School

पुणे : विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, शिक्षकांनी सध्या आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये," असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सूचविले आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. बैठकीस काळे यांच्यासह आमदार सुधीर तांबे, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सरचिटणीस संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा अविनाश तळेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तांबे म्हणाले, "कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील 'कायम' शब्द वगळण्यात आला आहे. बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांना अनुदान दिले पाहिजे. या शिक्षकांना शासनाकडून पगार दिला पाहिजे. अनुदानित शाळा असल्याशिवाय मुलींचे शिक्षण होऊ शकणार नाही."   

डॉ. शिंदे म्हणाले, "राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी विनाअनुदानित शिक्षकांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे त्यांना अनुदान मिळालेच पाहिजे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते तातडीने मार्गी लावावेत.

यामध्ये राज्यातील मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित उच्च माध्यमिक तुकड्यांना मार्च २०२० च्या वित्त विभागाच्या मंजुरीनुसार तात्काळ अनुदान द्यावे, २००३-०४ पासून प्रलंबित असणाऱ्या वाढीव व व्यपगत पदांना मंजुरी देऊन कार्यरत शिक्षकांना वेतन द्यावे, माहिती व तंत्रज्ञान (आयटी ) विषय शिक्षकांना अनुदान देऊन वेतन द्यावे, २ मे २०१२नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता वेतन देणे, या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे."

महासंघाच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशाचे अधिकार कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत
- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित असणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नेमलेल्या कमिटीच्या अहवालासंदर्भात पाठपुरावा करावा व तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा
- सेवानिवृत शिक्षकाच्या जागेवर ताबडतोब भरती करावी
- कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शाळा सुरु करण्याची घाई करू नये.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com