

Sugar mills across Maharashtra begin crushing operations for the 2026-27 sugarcane season
esakal
पुणे : राज्यातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी २०० साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने गाळप परवाने मंजूर केले आहेत. यामध्ये ९९ सहकारी आणि १०१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, परवाना नसलेल्या कारखान्यांना ऊस देऊन फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याची खात्री करूनच ऊस पाठवावा, असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे. तर आतापर्यंत १३८ कारखान्यांनी गाळप करण्यास सुरुवात केली आहे.