

Maharashtra Sugar Crisis
Sakal
पुणे : ऊसतोडणी मशिन मालकांनी प्रतिटन दर ५०० रुपयांवरून वाढवून ७०० रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच शासन आदेशानुसार ऊसतोडणी मशिन मालक आणि वाहतूकदारांच्या बिलातून पाचट कपात थांबवावी, तसेच ऊसतोडणी दरासंदर्भात त्रिस्तरीय समिती स्थापन करावी, अशा तीन प्रमुख मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास गाळप हंगाम सुरू होण्याच्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबरपासून राज्यातील मशिन मालक ऊसतोडणीचे काम थांबवतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिन मालक संघटनेने दिला आहे.