Land Survey: खासगी भूकरमापक नेमण्याची प्रक्रिया सुरू; मोजणीचे अधिकार देणार, नियमावली निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात
Revenue Department: राज्यात प्रलंबित असलेल्या लाखो मोजणी प्रकरणांना गती देण्यासाठी महसूल विभागाने खासगी भूकरमापक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नियमावलीच्या अंतिम टप्प्यानंतर एजन्सींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुणे : प्रलंबित मोजणी अर्ज मार्गी लावण्याबरोबरच मोजणीच्या कामाला गती देण्यासाठी महसूल विभागाने परवानाधारक खासगी भूकरमापकांची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.