
पुणे : ‘‘राज्य सरकारने हरित हायड्रोजनचे धोरण जाहीर करून, भरीव अनुदान व प्रोत्साहनात्मक योजना लागू केल्या आहेत. धान्यापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण सर्व साखर कारखान्यांच्या डिस्टलरींना लागू केल्यानंतर इतर उपपदार्थ आणि जैव सीएनजी हरित हायड्रोजन यासारखी अत्याधुनिक पुनर्निर्मिती ऊर्जा तयार करण्यासाठी राज्य सरकार ‘बायो सीएनजी’ चे धोरण लवकरच जाहीर करणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली.