Maharashtra Traders : जीएसटीमुळे महागाईचा तडाखा; जीवनावश्यक वस्तूंवरील कर शून्य टक्के करण्याची मागणी

Chilli Price Hike : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सामान्यांसाठी दिलासा म्हणून जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी शून्य टक्के करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.
Published on

मार्केट यार्ड : वाढती महागाई हा देशातील सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठा प्रश्‍न झाला आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत असून, त्यावर आकारण्यात येणाऱ्या पाच टक्के जीएसटीमुळे ही भाववाढ आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तू व मिरचीवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून शून्य टक्के करण्यात यावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सतर्फे (महाराष्ट्र) करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com