

Vertical Property Card
esakal
मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र ओळख आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद तयार करण्यासाठी महसूल विभागाने ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ ही नवी व्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे सात कोटी सदनिकाधारकांना फायदा होणार असून, मालकी हक्कांवरील वाद कमी होऊन व्यवहार पारदर्शक होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.