Vidhan Sabha 2019 : संभ्रम होईल अशी विधाने नकोत - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी विधाने कोणी करु नयेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी विधाने कोणी करु नयेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.

चंपाच्या बोलण्याला अर्थ नसतो...
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी पवार कुटुंबातील मंडळी भविष्यात भाजपमध्ये येउ शकतात, यावर भाष्य केले होते. याला उत्तर देताना चंपा काहीही बोलतात, त्याला काहीच अर्थ नसतो, असे सांगितले.

राज्य कर्जाच्या खाईत...
पाच वर्ष सत्तेत असणाऱ्या युती सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत नेउन ठेवले असून हा आकडा पाच लाख तीन हजार कोटी पर्यंत गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

कारण जनतेला सांगा.
भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते असणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, यांना गेल्या निवडणुकीच्या वेळेस तिकीट दिले होते. यावेळेस यांची तिकीटे का कापली हे जनतेला समजायला हवे. पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर उत्तर देताना त्यांनी मला वाटत नाही, असे उत्तर दिले.

निवडणुकीत जय पराजय असतो....
निवडणुकीत तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालिन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांचा पराभव झाल होता. मात्र, हे नेते नंतर विजयी झाले होते, त्यामुळे निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतो, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Ajit Pawar Sushilkumar Shinde Politics