Vidhan Sabha 2019 : चिंचवड : भाजपला पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल - डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

‘भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातून इतिहास गायब करण्याचा प्रयत्न असो अथवा गडकिल्ले भाडेकराराने देण्याचा निर्णय असो. तमाम मराठी बांधवांचा अवमान हे सरकार करीत आहे. भाजपला या पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल. ३७० कलम रद्द केले म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील समस्या सुटल्या, असे होत नाही,’’ असे मत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातून इतिहास गायब करण्याचा प्रयत्न असो अथवा गडकिल्ले भाडेकराराने देण्याचा निर्णय असो. तमाम मराठी बांधवांचा अवमान हे सरकार करीत आहे. भाजपला या पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल. ३७० कलम रद्द केले म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील समस्या सुटल्या, असे होत नाही,’’ असे मत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार डॉ. कोल्हे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली. त्यामुळे कोल्हे सांगवीतील सभेला पोचू शकले नाहीत. मात्र, या अडचणीवर मात करीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी मोबाईलवरून सभा घेण्याचा अनोखा प्रयोग डॉ. कोल्हे यांनी राबविला. त्यांनी मोबाईलवर ही सभा घेतली. या मोबाईल सभेची चर्चा चांगलीच रंगली.

कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. प्रचारासाठी जुनी सांगवी येथे गुरुवारी (ता. १७) डॉ. कोल्हे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जय मल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे, उमेदवार राहुल कलाटे, नगरसेवक नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, पृथ्वीराज साठे, संदेश नवले, मनसेचे राजू साळवे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, श्‍याम जगताप, शिवाजी पाडुळे, तानाजी जवळकर, प्रकाश ढोरे, कुमार ढोरे, कुंदन कसबे, अमरसिंग आदियाल, उज्ज्वला ढोरे, सोनाली जम, सुषमा तनपुरे, बाबासाहेब ढमाले, निखिल चव्हाण, सुरेश सकट, पंकज कांबळे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Chinchwad amol kolhe rahul kalate Politics