Vidhan Sabha 2019 : पर्वती : वनक्षेत्रासाठी ३० कोटींचा आराखडा - मिसाळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पाचगाव- पर्वती वनक्षेत्राच्या एकत्रित विकासासाठी वन विभागाकडून ३० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार या वनक्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याची माहिती पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

विधानसभा 2019 : पुणे - पाचगाव- पर्वती वनक्षेत्राच्या एकत्रित विकासासाठी वन विभागाकडून ३० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार या वनक्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याची माहिती पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

तळजाई परिसरात आज प्रचारफेरीचे आयोजन केले होते. त्याच्या समारोपप्रसंगी मिसाळ बोलत होत्या. नगरसेविका साईदिशा माने, महेश वाबळे, राहुल माने, सचिन देडे, गणेश लगस, रुपेश तुरू, करण देवेंद्र, प्रशांत खवळे, जयराम भोसले, सूरज खंडागळे, सुजय काळे, विजय बिबवे, बाळासाहेब ढवळे, रवींद्र चव्हाण, मुक्ता माने, प्रशांत थोपटे, सागर खोत आदी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, ‘‘पाचगाव- पर्वतीत ७५० एकर वनक्षेत्र आहे. तिथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सीमाभिंत बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या वनक्षेत्रासाठी विशेष निधीला मंजुरी मिळाली आहे. पर्यावरण, शिक्षण आणि आर्किटेक्‍चर विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.’’  मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘‘पर्वती मतदारसंघातील टेकड्या व मोकळ्या जागांवर गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. बांबू लागवडीचे उपक्रम राबविले. पाचगाव- पर्वती वनक्षेत्रात व्यायामप्रेमी आणि फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. नागरिकांना पर्यावरणविषयक माहिती मिळावी व जनजागृती व्हावी, या उद्देशाने निसर्ग परिचय केंद्रासारखे उपक्रम यशस्वी केले. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाला चालना दिली, त्यामुळे विजेच्या मागणीत घट होण्यास आणि प्रदूषण कमी होण्यास मदत झाली.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 parvati madhuri misal politics