Voter Awareness : मतदारांनो जागरूक व्हा... मतदान करा लोकशाहीत सहभागी व्हा !

Maharashtra voter awareness campaign : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुरसुंगी येथील बापूराव उर्फ श्रीपतराव गुंड महाराष्ट्रभर फिरून मतदारांमध्ये जनजागृती करत शंभर टक्के मतदानाचे आवाहन करत आहेत.
Maharashtra voter awareness campaign

Maharashtra voter awareness campaign

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : मतदारांनो जागरूक व्हा - मतदानाचा पवित्र हक्क बजावा - लोकशाहीत सहभागी व्हा व होवू घातलेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदारांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करत फिरणारे फुरसुंगी येथील बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड हे एक अवलियाच म्हणावे लागतील.राज्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये समाजातील नव व सर्व सुज्ञ मतदारांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन करीत महाराष्ट्रभर फिरून मतदारांचे प्रबोधन करण्याचे काम अविरतपणे करत आहेत.१६ जानेवारी रोजी त्यांनी आपल्या फुरसुंगी या गावातून या प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत ते मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या शक्यतो प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रबोधनाचे काम करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com