विनू मांकड करंडक क्रिकेट ३

विनू मांकड करंडक क्रिकेट ३
Published on: 

फोटो ः एकनाथ देवडे
प्रज्वल मोरे

महाराष्ट्राची राजस्थान संघावर मात
विनू मांकड करंडक क्रिकेट

पुणे, ता. १२ ः राजकोट येथे सुरू असलेल्या एलिट ‘अ’ गटाच्या एकोणीस वर्षांखालील विनू मांकड करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने राजस्थान संघाचा १४५ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा सलामीचा फलंदाज एकनाथ देवडे आणी प्रज्वल मोरेने केलेल्या सुरेख फलंदाजीचा होता.
निरंजन शहा मैदानावर सोमवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने नऊ बाद ३१७ धावा केल्या. या वेळी सलामीचा फलंदाज एकनाथ देवडेने १३४ चेंडूत २१ चौकार व तीन षटकारासह १५७ धावांची खेळी केली त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. त्याला प्रज्वल मोरेने ९५ चेंडूंत चार चौकार व चार षटकारांसह ८० धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. देवडे व मोरे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २२३ धावांची भागीदारी केली. शोभाग भाटीने ५१ धावा देऊन सहा गडी बाद केले.
राजस्थानचा डाव १७२ धावांतच संपुष्टात आला. या वेळी त्यांच्या आराध्य आगरवाल (३४), यथार्थ भारद्वाज (३३) आणि कुशाग्र ओझा (३२) हे तिघेच खेळपट्टीवर तग धरू शकले. शुभम कदमने तीन तर धनंजय झोरे व अनीश जोशीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. महाराष्ट्राचा चौथा सामना मणिपूर संघाबरोबर चौदा तारखेला होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः
महाराष्ट्र - (५० षटकांत) ९ बाद २१७ (एकनाथ देवडे १५७, प्रज्वल मोरे ८०, वेदांत गोरे २४, शोभाग भाटी ६-५१, सुमीत तेजी १-५४) विजयी विरुद्ध राजस्थान - (३९.३ षटकांत) सर्वबाद १७२ (आराध्य आगरवाल ३४, यथार्थ भारद्वाज ३३, कुशाग्र ओझा ३२, अभय शर्मा २४, शुभम कदम ३-३२, धनंजय झोरे २-१८ अनीश जोशी २-२६, एकनाथ देवडे १-२, ओम पाटील १-२८)
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com