

Maharashtra Water Rate Proposal Deferred for Six Months
Sakal
पुणे : घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नवीन दर प्रस्तावित करण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्यामुळे ठोक पाण्याचा वापर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह पाणी वापर संस्थांना याचा दिलासा मिळाला आहे.