कळंबच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिलवानांची सरशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra wrestlers in Kalamb Bharat Kesari Sikandar Sheikh Kolhapur pune

कळंबच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिलवानांची सरशी...

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथे लाल मातीच्या कुस्तीच्या आखाड्यातील महाराष्ट्राचे पहिलवान इराण,पंजाब,हरियाणाच्या पहिलवानांना सरस ठरले. अंतीम कुस्तीमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या भारत केसरी सिकंदर शेख याने इराणच्या हबीब याला दोन मिनिटामध्ये आसमान दाखवून आखाड्याचा विजयी पहिलवान होण्याचा बहुमान मिळविला. लाल मातीमधील कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजक उत्तम फडतरे गेल्या अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करतात. कळंबच्या कुस्त्या कुस्तीशौकीनासाठी पर्वणी असते. गुरुवार(ता.५) रोजी कै.बाबासाहेब फडतरे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य लाल मातीमधील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

अंतीम कुस्ती कोल्हापूरच्या सिंकदर शेख व इराणच्या हबीब मध्ये झाली. राेमहर्षक लढतीमध्ये शेख याने दोन मिनिटामध्येच हबीब याला आसमान दाखवून आखाड्याचा विजयी मल्ल होण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडे याने पंजाबच्या भोला पंजाबी याला बॅक साल थ्रो डावावर चितपट केले. तृतीय क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या प्रकाश बनकर याने हरीयाणाच्या तेजाला ढाक डावावर चितपट करुन विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पुण्याच्या महेंद्र गायकडवाड याने हरियाणातील बंटी कुमारला घुटना डावावर पराभूत केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती फडतरे नॉलेज सिटीचा विद्यार्थी आणि पुण्याचा पहिलवान वेताळ शेळके व पंजाबमधील पहिलवान विक्रांत कुमार यांच्यामध्ये झाली.यामध्ये शेळके याने दुहेरी पटावर समोरून पंजाबच्या पहिलवान विक्रांत कुमारला पराभूत केले.

सहाव्या क्रमांकाची कुस्तीमध्ये राघू ठोंबरे याने कोल्हापूरमधील दयानंद घोडके याला चितपट केले. कुस्तीच्या आखाड्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार बापूसाहेब पठारे, लोकमंगल ग्रुप महेश देशमुख, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी , पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, दत्तात्रेय फडतरे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ,हनुमंत फडतरे,जय फडतरे उपस्थित होते. पंच म्हणून छत्रपती पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच गोविंद पवार,पहिलवान विष्णू गोरे,पहिलवान विलास खंदारे, सचिन चांदणे यांनी काम पाहिले.

Web Title: Maharashtra Wrestlers In Kalamb Bharat Kesari Sikandar Sheikh Kolhapur Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top