
पुणे - बांधकाम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील तब्बल ११ हजार गृहनिर्माण प्रकल्पांना आतापर्यंत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई महाप्रदेशात सर्वाधिक सव्वापाच हजार गृहप्रकल्प अपूर्णावस्थेत असून, त्यापाठोपाठ पुणे विभागातील साडेतीन हजार गृहप्रकल्पांचे बांधकाम रखडले आहेत.