छायाचित्रांतून उलगडले गांधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

‘गांधी हा भारताचा प्रधान विचार आहे. गांधीविचार प्रत्येक भारतीयाला पचणारा आहे. त्यापासून आपण दूर जाता कामा नये,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘गांधी हा भारताचा प्रधान विचार आहे. गांधीविचार प्रत्येक भारतीयाला पचणारा आहे. त्यापासून आपण दूर जाता कामा नये,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. 

महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते सोमवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली वि. म., माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत जयवंत मठकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर बाळासाहेब शिवरकर, रजनी त्रिभुवन, बाळासाहेब दाभेकर उपस्थित होते. 

सणस मैदानाजवळील व्यंग्यचित्रकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, ते दोन ऑक्‍टोबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील दुर्मीळ छायाचित्र ठेवण्यात आले आहेत.

सत्याग्रहातील गांधी, गोलमेज परिषदेत सहभाग, मिठाचा सत्याग्रह, कराची काँग्रेस अधिवेशन, पेशावर येथील सार्वजनिक सभेला संबोधित करताना, ‘भारत छोडो’ आंदोलनात उभे असताना, व्हाइसरॉयबरोबर चर्चा करताना, गांधी-जीना भेट, बिहार येथील दंग्यामधील जखमींबरोबर, मुंबई काँग्रेस अधिवेशनात, शेवटची प्रार्थना, अंतिम यात्रा, अशी छायाचित्रे यात पाहता येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi Photo Exhibition