महात्मा गांधींनी राष्ट्रभक्ती, जाती निर्मुलनाचे कार्य केले - सुशीलकुमार शिंदे

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSakal
Summary

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.

कोथरुड - राष्ट्रभक्ती आणि जातीयता निर्मूलनाचे काम देशात महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रेरणेने नेहरूंनी समाजवादी समाजरचना आणली. गरीबी श्रीमंतीची दरी कमी होत नाही. लोकसंख्या वाढीने प्रश्न अजून जटील होत आहे. अशा वेळी गांधीविचार विसरून चालणार नाही. असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, विश्वस्त एम.एस.जाधव ,रमेश कुंडूसकर, नोएल माजगावकर, जांबुवंत मनोहर,नीलम पंडित, अप्पा अनारसे, पल्लवी भागवत, मीना साबद्रा,मौलाना इसाक, ग्यानी अमरजीत सिंग ,फादर पीटर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, गांधी- नेहरूंची काँग्रेस आता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सर्व धर्मसमभाव आचरणात आणला पाहिजे. गांधी स्मारक निधी, युक्रांदने त्यात योगदान देत राहावे, अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ' महात्मा गांधी हे संतपरंपरेच्या मालिकेतील व्यक्तीमत्व होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या त्यांच्या कार्यावर, जातीव्यवस्था नाकारण्यावर पुण्यातील धर्मवादी नाराज होते. ज्या शक्तींना मूळ धारेतून आपण बाजूला ठेवले, त्या फॅसिस्ट शक्ती बळकट होत आहेत. हे आव्हान समविचारी पक्ष, संस्था, संघटनांनी गांधी विचाराच्या साहाय्याने पेलले पाहिजे.

गांधीभवन येथे १ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे विविध कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन होते.

संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.एम.एस.जाधव, सर्व धर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी या डॉ.कुमार सप्तर्षी लिखित पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रे बद्दल माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात कसलाही उल्लेख न केल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. शिंदे चव्हाणांच्या मताचे झालेत काय असे म्हणत ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com