आसगावकर गुरूजीच शिक्षकांचे आमदार; पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले होते.

पुणे- मतदानाची वाढलेली टक्केवारी, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बळ आणि शिक्षकांनी केलेले एकगठ्ठा मतदान यामुळे जयंत आसगावकर गुरूजीच पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ठरले आहेत. त्यांनी १९ हजार ४२६ मते घेत अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांचा ६ हजार ८२३ मतांनी पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप पुरस्कृत उमेदवारापेक्षा आसगावकर यांचे मताधिक्य जास्त आहे. 

शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले होते. ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरूवारी (ता.३) सकाळपासून बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू झाली. त्यामध्ये ५० हजार २२६ मते वैध तर २ हजार ७८४ अवैध मत ठरली. विजयासाठी २५ हजार ११४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. 

यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरुन मुंबई पालिकेत भाजप- शिवसेना सदस्यांचा राडा

शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. मतमोजणीत सुरूवातीपासूनच आसगावकर हे पुढे राले. परंतू भाजप पुरस्कृत उमेदवार पवार यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार सावंत यांनीच चांगली लढत दिली. त्यामुळे आसगावकर यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी करावी लागली. शुक्रवारी दुपारी शेवटच्या ३०व्या फेरी पर्यंत आसगावकर यांनी आघाडी टिकवून ठेवली. अंतिम निकाल हाती आले तेव्हा आसगावकर यांनी ६ हजार ८२३ मतांनी विजय मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. 

माझ्या विजयात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिक्षक, संस्था, संघटना यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थांनी त्यांचे बहुमोल मत माझ्या पारड्यात टाकले, असं विजयी उमेदवार जयंत आसगावकर म्हणाले आहेत.  

नागपूर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा? 

एकुण मतदान - ७२५४५ 

झालेले मतदान - ५२९८७

वैध मतदान - ५०२२६

अवैध मतदान - २७७४

विजयासाठीचा कोटा - २५११४

प्रमुख उमेदवारांना पडलेली मते 

जयंत आसगावकर - १९४२६

दत्तात्रेय सावंत - १२६०३

जितेंद्र पवार - ६६०७

गोरखनाथ थोरात - ५१८०
प्रकाश पाटील - २७५८

रेखा पाटील - २१५८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aghadi candidate jayant aasgawkar win in pune teacher constituency