Pune News : महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख गैरहजर

महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद चव्हाट्यावर.
gajanan tharkude and sanjay more
gajanan tharkude and sanjay moresakal
Updated on

पुणे - महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद चव्हाट्यावर आलेला असताना आज (ता. १९) पुण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेनेच्या दोन्ही शहर प्रमुख गैरहजर राहिले.

महाविकास आघाडीतील जागा वाटप पूर्ण होत आले आहे. पण मुंबई आणि विदर्भातील जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांचे वादही झाले. त्यावर आज पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याचे पडसाद पुण्यातही उमटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com