

Devotees Chant Lord Mahavira’s Name as Grand Rally Takes Over Pune Streets
sakal
पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की...जय बोलो महावीर की’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ अशा जयघोषाने शहर मंगळवारी दुमदुमले. तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५व्या जन्मकल्याणकनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांनी सजलेले सुमारे २० रथ यामध्ये सहभागी झाले होते.